आई माझी
आई या शब्दाची व्याख्या कशी मी वर्णन करू!
तू केलेल्या कष्टाची छाया कशी मी कशी भरू!!
तू होतीस साधी भोळी, तू प्रेमळ तुझी माया!
रात्रंदिवस कष्ट केलं, घामाने भिजलेली ती तूझी काया!!
बालपण आठवते तूझ्या कुशितले!
अंगाई गीत सुमधुर आवाजात यावे तूझ्या ओठातले!!
किती छान वाटतं होत मला लहानपण!
तूझ्या आठवणीतून जाग झालं ते बालपण!!
आई कीती थोर आहेस तू माझ्यासाठी!
"आई" शब्दाची व्याख्या कळली सर्वांना, कविता फक्त त्यांच्यासाठी!!
कवी:- सूर्यकांत देशमुख
💐💐💐💐💐💐
Comments
Post a Comment